|| संस्थान चे दैनिक व वार्षिक कार्यक्रम ||

सकाळी
5.30 ते 6 पर्यंत काकडआरती
7 ते 9.30 लघुरूद्र, पादुकापूजन, श्रींची पूजा
10 ते 11.30 सत्यदत्त पूजा
12 वाजता आरती, शंखोदक व पूजा करणा-या भक्तांना व परगावच्या भक्तांना प््रासाद(भोजन)
दुपारी
3 वाजल्यानंतर भजन, प््रावचन, कीर्तन
सायंकाळी
7.30ते 8.30 पंचपदी
रात्री
8.30 वाजता आरती, करूणाष्टके, शंखोदक
9.00 वाजता शेजारती
रात्री भजन कीर्तन असल्यास शेजारती नसते.

1. संस्थानात दररोज सकाळी काकड आरती, पूजाअभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर 8 वाजता शंखनाद होतो. त्या वेळी निर्गुणपादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात.
2. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभा-याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघडया डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी सगळया भक्तमंडळींना त्यांचे दर्शन घेता येते.
3. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करितोपर्यंत त्या उघडया ठेवितात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवण्यात येऊन डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. त्यानंतर दुस-या दिवसापावेतो पादुकांचे फिरून दर्शन घेता येत नाही.
4. मंदिरात दोन पुजारी आहेत. मंदिराच्या गाभा-यात मुख्य पुजा-याशिवाय इतर कोणीही जाऊ नये असा कडक निर्बंध आहे. मुख्य पुजारी हा गाभा-यात, श्रींची मूर्ती, दत्तात्रेयाची उत्सवमूर्ती व पादुका, निर्गुण पादुका यांची पूजा करतो. दुय्यम किंवा मदतनीस पुजारी हा अश्वत्थ वृक्षाखालील श्रींच्या पादुका व काशीविश्वेश्वर यांची पूजा करितो. शिवाय त्यांच्याकडे भक्त मंडळींस तीर्थ देण्याची कामगिरी असते.
5. मंदिरात श्रींचे फोटो विक्रीकरिता आहेत.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा आहे. शिवाय गुरूचरित्र सप्ताह करण्याच्या इच्छेने मंदिरात येणारास मंदिरात 1 वेळ भोजन मिळते.

पालखी केव्हा काढतात याचे सूचिपत्रक
(1) दर गुरूवारी पालखी काढतात.
(2) श्रीदत्तात्रयाचे 16 अवतार(जयंती) एकूण 16 जयंत्या वर्षातून असतात. त्यावेळी प््रात्येक तिथींना पालखी काढतात. त्यांची यादी सोबत दिली आहे. त्याशिवाय खालील तिथींना पालखी काढण्यात येते.
श्रीपादश्रीवल्लभ जयंती- भाद्रपद शुध्द चतुर्थी 4 श्रीपादश्रीवल्लभ पुण्यतिथी- आश्विन वद्य द्वादशी 1
श्री.प.पू.वासुदेवानंदसरस्वती जयंती- श्रावण वद्य पंचमी 5
श्री.प.पू.वासुदेवानंदसरस्वती पुण्यतिथी- आषाढ शुध्द प्रतिपदा 1
श्री. प.पू. ब्रम्हानंदसरस्वती जयंती- भाद्रपद शुध्द पौर्णिमा 15
श्री. प.पू. ब्रम्हानंदसरस्वती पुण्यतिथी- मार्गशीर्ष शुध्द दशमी 10
श्री.द.स्व.प.पू. अक्कलकोटस्वामीमहाराज पुण्यतिथी- चैत्र वद्य त्रयोदशी 13
श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराज जयंती- पौष शुध्द द्वितीया 2
श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराज निर्वाणदिन- माघ वद्य 1 प्रतिपदा
हया तिथीला पालखी सर्व गावातून ठरावीक मार्गाने मिरवतात. ठिकठिकाणी भक्तलोक पूजा वैगरे करतात.