|| मनोगत||

|| अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त||

|| श्रीगुरूःशरणम्||
भगवान प.पु. श्री स्वामी महाराजांच्या जन्मस्थळा विषयीचा हा आमचा पहिलाच प्रयत्न. श्री गुरूमहाराजांविषयी असलेला आपला भक्तीभाव अधिकाधिक दृढ व्हावा हि महाराजांच्या चरणी प्रार्थना. कृपया या उपक्रमाविषयक आपल्या सुचना टिका अभिप्राय माहिती निवेदन विवेचन तसेच आपल्या अनुभवाचे व योगदानाचे आम्ही मनापासुन स्वागत करीत आहोत आणि म्हणुनच आपण आपल्या प्रतिक्रीया प्रांजळपणे कळवाव्यात. प्रथमताःच श्री गुरूमहाराजांचे चरित्र्र व अवतारकार्य मराठीतुन इंटरनेट वर जगाच्या कानाकोप-यात पोहचवण्याचा प्रयत्न करावा असे अनेक भक्तांनी सहकार्यांनी आम्हांला पत्र्राद्वारे फ़ोनद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेटीत सांगितले. सहाजिकच आमचा उत्साह द्विगुणीत इााला व हा प्रसादिक ग्रंथ इंटरनेट द्वारे वाचकांना उपलब्ध करून देण्यची मानसिक व आर्थिक सिध्दता होताच त्या दृष्टीने गाठीभेटी व सल्लामसलत होऊन या वेदतुल्य गुरूचरीत्र्रग्रंथाचीद्वएब्स्तिएवेगळयाच स्वरूपात निर्माण करण्याचा संकल्प सोडला. प्रस्तुत वेबसाईट मध्ये विविध माहितीपुर्ण मजकुरांचा समावेश तर आहेच. त्याशिवाय दत्त भक्तांना मौलिक मार्गदर्शन करणारी श्री गुरूचरित्र रहस्य हि प्रर्दिघ प्रस्तावना सामाविष्ट केली आहे. जी जिज्ञासुंनी नुसती चाळली तरी त्यांना त्यांच्या ब-याच प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळु शकतील. इंटरनेट वर वाचकांच्या पसंतिला जर हि वेबसाईट उतरली तर आंम्ही सवर्ांनी घेतलेल्या अथकश्रमांचे सार्थक होईल. व सर्व दत्त भक्तांना हा रसाळ प्रासादिक शिघ््रा फलदायी असा ग्रंथ उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा गुरूमहाराजांनीच प्रेरणा देऊन संकल्पीत करून फलित करून घेतली असा आमचा दृढ भाव होईल .

डॉ र्मिलिंद पांडे क़ोथरूड पुणे.
ः संपर्काचा पत्ता ः
श्री गुरूमंदिर संस्थान
ता.कारंजा(लाड) जि.वाशिम
महाराष्ट्र भारत 444105.
ः दुरध्वनी क्रं.ः
(07256) 222455 किंवा 224755